धुळे: धुळे महापालिका मतदार यादीत सावळागोंधळ; हरकतींचा आकडा २६ हजारांवर
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या तफावती समोर येत असून हरकतींचा आकडा २६ हजारांवर पोहोचला आहे. अनेकांची नावे चुकीच्या प्रभागात गेली असून दुबार नावेही आढळली. एका दिवसात तीन हजार तक्रारी वाढल्या आहेत. प्रभाग १९ आणि १२ मध्ये सर्वाधिक त्रुटी दिसत असून संभाव्य उमेदवारांमध्ये धावपळ आहे. केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने दुरुस्तीसाठी महापालिकेत गर्दी करत आहेत.