दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपुर्ण देशात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते 9 डिसेंबर पासून ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम आयोजित असून याच दिवशी नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता सैनिक मेळावा सुध्दा घेण्यात येणार आहे.