चाळीसगाव: राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक चाळीसगावात संपन्न; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार
चाळीसगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका - विशेषतः जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे २६ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यावर भर देणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.