राहुरी: राहुरी फॅक्टरी ते मोरवाडी या मार्गावर नविन रस्ताचे नित्कृष्ट काम,नागरींचा संताप
नुकताच खासदार निधीतून राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ते मोरवाडी या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार केलेला रस्ता काहीच दिवसांतच उखडू लागला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरी ठिकठिकाणी डांबर उखडलेले दिसून येत आहे. या रस्त्याच्या कामात वापरलेले साहित्य,कामाच्या गुणवत्तेची तत्काळ तपासणी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.