चामोर्शी: चामोशी तालुक्यात दुरिया खतांचा तुटवडा, शेतकरी संकटात, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन .
चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यातील एक मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शीमध्ये सध्या युरिया खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, भातशेतीची वाढ खुंटल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) वैद्यकीय मदत कक्षाने तहसील कार्यालय आणि कृषी विभागाला निवेदन देत तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते आणि सध्याच्या हंगामात पि