मलकापूर तालुक्यातील विवरा येथील 18 वर्षीय युवती 21 आक्टोबर रोजी हरविल्याची नोंद मलकापूर एम आय डि सी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.विवरा येथील दिव्या निना भगत ही 18 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मलकापूर एम आय डि सी पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 23 आक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.