शेवगाव शहरातील गजबजलेल्या डॉ. आंबेडकर चौकात चारचाकी वाहनाची काच फोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. घटनेमुळे शेवगावमध्ये खळबळ उडाली आहे.शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिलेल्या तक्रारीवरून घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.