दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोज शनिवारला दुपारी 12.00 वाजता धरती आबा बिरसा मुंडा यांची 150 वि जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षाताई विजय पटले होत्या. तर सप्तरंगी ध्वजारोहक पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला सरपंच वर्षा पटले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.