अर्जुनी मोरगाव: कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध येथे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा भव्य मेळावा व सत्कार समारंभ संपन्न
कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव / बांध येथे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा भव्य मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमारजी बडोले प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष शमुकेशजी शिवहरे,उपाध्यक्ष लक्ष्मीचंदजी मेश्राम,संचालक शिवलालजी उके,संचालक राजहंसजी ढोके,संचालक ताराचंदजी भोगारे,संचालक वालचंदजी बाडबरई,संचालक रोहितजी पटले आदी मान्यवर उपस्थित होते.