अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 13 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलिसांनी कुख्यात दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडी, वाहन चोरी यासारख्या गुन्ह्यांचा खुलासा केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी दिली आहे.