उदगीर: पिंपरी जवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत एक जण ठार
Udgir, Latur | Sep 15, 2025 उदगीर तालुक्यातील पिंपरी जवळ टिप्परच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे, उदगीर जळकोट रोड पिंपरी जवळ वाळूची वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक एम एच ०४ जेके ९६८५ च्या चालकाने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली यात दुचास्वार जागीच ठार झालाय या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला,पोलिसांनी सदरील मृतदेह शवविच्छेदना साठी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.