परभणी येथे चंद्रशेखर बावनकुळे यांचे शनिवारी दुपारी हेलिकॉप्टर द्वारे आगमन झाले. यावेळी त्यांचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेशराव वरपुडकर,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी स्वागत केले. तसेच परभणी शहरात ठिकठिकाणी बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हा भाजपा जनसंपर्क कार्यालयात परभणी येथे भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा नेते चंद्रशेखर बावणकुळे यांचा प्रमुख उपस्थिती पार पडली. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.