कुही: कौशल्य मंगल कार्यालय कुही येथे आमसभेचे आयोजन
Kuhi, Nagpur | Oct 15, 2025 पंचायत समिती कुहीच्या वतीने कौशल्य मंगल कार्यालय कूही येथे 15 ऑक्टोबर बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास उमरेड विधानसभेचे आमदार संजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील विविध गावातील सरपंच व उपसरपंच यांनी जनसमस्या मांडल्या, त्यावर अधिकारी यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी गावागावातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.