शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात एका लॉरीवर काम करणाऱ्या युवकाने रस्त्यावर सापडलेले पॉकेट त्याच्या मूळ मालकाला 11 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे 6 वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे परत केल्याने युवकाच्या प्रामाणिक कृत्यासाठी पोलिसांनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले.अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही दाखवलेला श्याम भिल यांचा प्रामाणिकपणा हा शिरपूर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.