वैजापूर येथील नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्यांची सुरक्षितता आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत तयारी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतपेट्यांच्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासन, पोलिस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.