अंबरनाथ: बदलापूरच्या ऐतिहासिक कात्रप तलावाचे सौंदर्य धोक्यात; अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप
बदलापूरमधील ऐतिहासिक कात्रप तलाव परिसरात सध्या स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. तलावाच्या सुशोभीकरणासाठी पालिका दरवर्षी मोठा निधी खर्च करत असताना, तलाव परिसराची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तलावाच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, निर्माल्य आणि इतर कचरा साचला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.