कडेगाव: खंबाळे औंध येथील पोल्ट्रीवरील हल्ला : १६,५०० अंडी फोडली, ९९ हजारांचे नुकसान
खानापूर तालुक्यातील विटा येथील पोल्ट्री व्यवसायिक रामचंद्र नामदेव जाधव (वय ७०) यांच्यावर मोठा आर्थिक आघात झाला असून, त्यांच्या पोल्ट्री फार्ममधील सुमारे १६,५०० अंडी फोडून तब्बल ९९ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना २ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात आज दिनांक ५ जून रोजी सकाळी ११ वाजता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.