२५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह एका खाजगी व्यक्तीस अटक लातूर : लाचलुचपत विभागाच्या पथकाने शिरुर अनंतपाळ येथे रचलेल्या सापळा कारवाईत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह एका खाजगी व्यक्तीस अटक केली आहे. दि. १० डिसेंबर २०२५ रोजी उजेड (ता. शिरुर) येथील ४५ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीपासून ही कारवाई विकसित झाली.