चामोर्शी: खेमनचेरू टोला गाव आजही रस्त्याविना, पावसाळ्यात होतो जीवघेणा प्रवास#jansamasya
गडचिरोली: अहेरी तालुक्यापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या खेमनचेरू टोला येथील गावकऱ्यांना आजही योग्य रस्त्यासाठी आणि नदीवरील पुलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाळ्यात तब्बल पाच महिने हा गाव इतर ठिकाणांपासून तुटलेला असतो आणि गावकऱ्यांना छातीभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या परिस्थितीसाठी आजाद समाज पार्टीने थेट मंत्री बाबा आत्राम यांना जबाबदार धरले आहे.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात येथे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. केवळ दोन महिनेच दुचाकीने प्रवास करणे शक्य