अमळनेर: अमळनेरात महाविकास आघाडीतर्फे जनअक्रोश मोर्चा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ उतारा कोरा करणे आणि खरीप पिकांना पीकविमा मंजूर करणे अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे भव्य जनाआक्रोश मोर्चाचे आयोजन बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले होते.