नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी प्रक्रिया दिनांक 21रोजी पूर्ण झाली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नगरपरिषदेच्या एकूण 20 ही नगरसेवक पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, नगराध्यक्ष पदासाठी डॉ. अर्चना अडसड रोठे (अक्का) यांनीही भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच धामणगांव रेल्वे शहरात आतिषबाजी, ढोल-ताशांचे गजर, कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त करत विजयाचा उत्सव साजरा केला.