दारव्हा: शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात भारतीय युवा मोर्चाचे “खड्डे भरो आंदोलन”
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर व भ्रष्टाचाराविरोधात भारतीय युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत एकाच वेळी “खड्डे भरो आंदोलन” छेडण्यात आले. दारव्हा शहरातही बसस्थानक परिसर, आर्णी रोड, गोळीबार चौक, जुना दिग्रस रोड, तसेच दारव्हा-तळेगाव मार्गावरील प्रमुख खड्ड्यांकडे लक्ष वेधून निषेध नोंदविण्यात आला.