मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीजेएस इंडिया जेम अँड ज्वेलरी शो २०२५ प्रदर्शनाचे उद्घाटन
आज मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीजेएस - इंडिया जेम अँड ज्वेलरी शो २०२५ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रात रोजगाराच्या अमर्याद संधी आहेत. या क्षेत्रातील प्रगतीमुळे वैश्विक स्तरावर या क्षेत्रात नेतृत्व करण्याची भारतात क्षमता आहे. राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठांतर्गत या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.