प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसोला येथे कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत 12 पात्र लाभार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
5.5k views | Yavatmal, Maharashtra | Feb 21, 2025 यवतमाळ : राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसोला येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 12 पात्र लाभार्थ्यांना भरती करण्यात आले होते. तज्ञ शस्त्रक्रिया सर्जन डॉक्टर माणिक घोरसडे यांनी सदर पात्र लाभार्थ्यांवर यशस्वी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक /सहायिका, आरोग्य सेवक/ सेविका व इतर कर्मचारी उपस्थित राहून सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.