मंगळवेढा: चडचण येथे बँकेवर 63 कोटींचा दरोडा, दरोडेखोरांनी वापरलेली गाडी आढळली हुलजंती गावाजवळ
कर्नाटकच्या चडचण परिसरातील भीमातीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मंगळवार 16 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली.कर्मचारी गेटला कुलूप न लावता काम करत असताना, तीन मुखवटा घातलेले लोक शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूने धमकावले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांकडून स्ट्राँग रूममधून माहिती काढत त्यांना नंतर बांधून ठेवले होते. या घटनेनंतर चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटांत बँक लुटली आणि ते पसार झाले होते.