यवतमाळ: आर्णी तालुक्यातील दिव्यांग, निराधार, पारधी व आदिवासी समाजाच्या समस्या कायम ; मनोज गेडाम
आर्णी तालुक्यातील दिव्यांग, निराधार, पारधी समाज व आदिवासी बांधवांच्या विविध समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समस्यांवर अनेक वेळा निवेदनाद्वारे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही ठोस अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गुरुदेव युवा संघाने आमदार राजू तोडसाम यांना शेवटचा अल्टिमेटम देत लिखित आश्वासनानंतरही कार्यवाही न झाल्यास विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.