महाड: दिबांच्या जीवन प्रवासातील महत्त्वपूर्ण घटना आणि कार्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार
Mahad, Raigad | Sep 20, 2025 प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांच्या कार्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात त्यांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वपूर्ण घटना आणि कार्याची माहिती विद्यालयाच्या भिंतींवर आकर्षकपणे रेखाटण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आज शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास या उपक्रमाची पाहणी करून आढावा घेतला तसेच आवश्यक त्या सूचना केल्या.