आरोग्य विभाग व GPS मित्र परिवार आयोजित डोळे तपासणी कॅम्प पाळधी विश्रांतीगृह येथे घेण्यात आला. कॅम्प ला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. एकूण 810 लाभार्थी मधून 230 जणांची मोतीबिंदू ऑपेरेशन साठी निवड झाली. माजी जि प सदस्य म भाऊसो प्रतापराव पाटील माजी प स सदस्य म मुकुंदराव नन्नवरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा आ केंद्र पाळधी चे वैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश झवर CHO डॉ संदीप पाटील, डॉ प्रीती पाटील, डॉ रितूल पाटील, डॉ हर्षा भट व आरोग्य सहाय्यक अरुण वारुळे व अनिल महाजन गटप्रवर्तक श्रीमती संगीता पाटील, प्रा आ केंद्र चांदसर व पाळधी चे कर्मचारी व आशासेविका हजर होते.