रामटेक: चोर बावली शिवारात एका भरधाव ट्रकने उभ्या ट्रक व कारला दिली धडक; सहा जण किरकोळ जखमी
Ramtek, Nagpur | Sep 15, 2025 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवलापारकडून नागपूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने चोरबावली शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली व याही पुढे जाऊन समोर धावणाऱ्या एका कार क्रमांक एमपी 19 सीबी 49 07 ला मागून धडक दिल्याची घटना सोमवार दिनांक 15 सप्टेंबरला पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी घडली. या घटनेत किरकोळ सहा जण जखमी किरकोळ जखमी झाली आहेत.