यावल: यावल नगरपालिकेत गुरुवारी सहा जणांची निवडणुकीतून माघार, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी शेवटची मुदत
Yawal, Jalgaon | Nov 20, 2025 यावल नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. दरम्यान आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.