नाशिकरोड,चेहडी पंपिंग,हनुमान मंदिर येथून पंधरा वर्षे अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली असून रात्री आठ वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांचा पंधरा वर्षे अल्पवयीन मुलगा हा चेहडी पंपिंग,हनुमान मंदिर चौक येथून अकाउंटच्या क्लासला जातो असे सांगून गेला असता बराच वेळ घरी परत आला नाही.त्याची क्लासमध्ये व मित्रांमध्ये चौकशी केली असता त्याचा शोध लागला नाही.