उमरेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज, २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपाच्या प्राजक्ता कोरु यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, उमरेडच्या राजकारणात कमळ पुन्हा एकदा जोमाने फुलले आहे.आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.