चिखली: खंडाळा मकरध्वज येथे नदीच्या पुरात वाहून गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
चिखली तालुक्यात काल (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले असून, तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे शेतातून घरी परतणारे शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग (वय ८५) हे नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. काल रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. परंतु, आज सकाळी त्यांचा मृतदेह खंडाळा म. ते शेलगाव जहागीर नदीपात्रात आढळून आला.