साक्री: बिबट्याच्या हल्ल्यात ६ जण जखमी;भाडणे गावाजवळ नांदवण शिवारातील घटना
Sakri, Dhule | Nov 20, 2025 साक्री तालुक्यातील नांदवन-त्रिशूलपाडा-भाडणे या मार्गावर काल सायंकाळी बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या दीड तासाच्या कालावधीत बिबट्याने तब्बल चार जणांवर हल्ला चढवला. या घटनांमध्ये तीन दुचाकींवरील ६ जण जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे..नामपूर - मालेगाव-नाशिककडे जाणारे साक्री शहरासह तालुक्यातील