गोरेगाव: आमदार राजकुमार बडोले यांनी केली ग्राम पंचायत निंबा येथे अतिवृष्टीग्रस्त धान पिकाची पाहणी..
आमदार राजकुमार बडोले यांची ग्राम पंचायत निंबा येथे अतिवृष्टीग्रस्त धान पिकाची पाहणी केली. दिनांक 25,26 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोरेगाव तालुकासह ग्राम पंचायत निंबा येथिल शेतकऱ्याचे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या पार्श्वभूमीवर नुकतेच ग्राम पंचायत निंबा सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी विविध वृत्तपत्रातून शासनाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या झालेल्या धान पिक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली होती.