जिल्ह्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून या निवडणुकीमध्ये अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अशा अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी आयोगाच्या वतीने निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पक्षी सिलेंडर आधी चिन्ह उमेदवारांच्या मागणीनुसार वाटप करण्यात आले. सदर चिन्हांचे वाटप उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार निलेश पळसकर आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निलेश गायकवाड यांनी केले.