हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या वर्षी उदगीर शहरातील देगलूर रोड येथे नाईक चौकात उभारण्यात आला, आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला मात्र या पुतळ्यावर व पुतळ्याच्या अवती भोवती मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे,पुतळ्यावर साचलेली धूळ व व परिसर स्वछतेकडे उदगीर नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे,नगरपालिका प्रशासनाने पुतळा परिसर स्वछ करावा अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे