समुद्रपूर: शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्साहात साजरा:पथसंचलन करत देशभक्तीचा व संघभावनेचा संदेश
समुद्रपूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशताब्दी वर्षानिमित्त आयोजित श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले होते.या उत्सवाला राममूर्ती पोनगँटी, जेठामलजी राजपूत,धर्मेंद्रजी मुंदडा जिल्हा सहयोजक भारतीय विचार मंच,रवीजी गाठे, तालुका संघचालक आदी उपस्थित होते.यावेळी शहरातील मुख्य मार्गाने स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत देशभक्तीचा आणि संघभावनेचा संदेश दिला.