नेर: धनज येथे गोवर्धन (गायगोधन पूजा )पूजा उत्साहात साजरी
Ner, Yavatmal | Oct 22, 2025 आज दिनांक 22 ऑक्टोबरला धनज येथे गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी लवकरच गोपालकांनी आपल्या गोधनाला स्नान घालून रंगीबिरंगी रंगाने सजविले.तसेच फुलांच्या माळा, घंटा व झेंड्याने सजवलेल्या गोधनाची विधीवत पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला.डफळी,टाळ मृदंगाच्या निनादा मध्ये तसेच फटाक्याच्या आतिशबाजी मध्ये गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.