जालना: जालन्यात काळवीट शिकार प्रकरणी गारखेडा गावात एकाला अटक, जालना वनविभागाची कारवाई..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालन्यात काळवीट शिकार प्रकरणी गारखेडा गावात एकाला अटक, जालना वनविभागाची कारवाई.. मा.न्यायलयाने आरोपीला तीन दिवसाची वनकोठडी सुनावली.. जालना वनविभागाने केलेल्या कारवाईत काळवीट या संरक्षित वन्यप्राण्याची शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून काळवीटाचे मांस, शिंगे आणि शिकार करण्यासाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत. आज दि.16 मंगळवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास प्रसिध्दीपत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाला गुप्त माहिती मिळाली होती