पुणे शहर: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना
Pune City, Pune | Sep 15, 2025 पुणे शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील अनेक स्थानिक शाळांनी आज (15 सप्टेंबर 2025) सुट्टी जाहीर केली आहे.