आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (एचएमआयएस) अंतर्गत कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन तसेच नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. ही उल्लेखनीय कामगिरी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. गंडाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी मा. डॉ. सचिन शेकडे साहेब, मा. डॉ. रौफ सर व मा. डॉ. आठवले सर यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली जिल्हा प्रथम क्रमांका वर आला.