यावल: यावल शहरात नायलॉन मांजा विक्री करताना एकाला पकडले, मुद्देमाल जप्त करून यावल पोलिसात केला गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Dec 14, 2025 यावल शहरातील खिर्णीपुरा भागातील दुकानदार शेख असलम यांनी आपल्या दुकानात महाराष्ट्रात बंदी असलेला नायलॉन मांजा हा विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पथक त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडून एक हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.