अमळनेर: दहिवद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ जात असताना दहिवद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.