घराच्या बांधकामासाठी जागा सोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, एका तरुणावर लोखंडी पावड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मोहाडी तालुक्यातील कुशारी येथे १९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादी समीर राजहंस चामट (१९) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील घराच्या स्लॅबवर लोखंड बांधण्याचे काम करत असताना आरोपी अश्विन नूरज चामट याने 'आमच्या बाजूने जागा सोडली नाही' असे म्हणून शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली.