दारव्हा: शहरात आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा,“एक तीर, एक कमान — सारे आदिवासी एक समान” च्या घोषणा
सकल आदिवासी समाज नियोजन समितीच्या वतीने सोमवारी दारव्हा शहरात अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या रक्षणासाठी एक भव्य जन आक्रोश मोर्चा दि.१३ ऑक्टोंबर ला दुपारी बारा वाजता दरम्यान काढण्यात आला. “एक तीर, एक कमान — सारे आदिवासी एक समान” या घोषवाक्याने दुमदुमलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एसटी आरक्षणात इतर समाजांच्या घुसखोरीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.