पारनेर: सुपा येथे रयत शिक्षण संस्था, न्यू इंग्लिश स्कूल यांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मा. शरदचंद्रराव पवार साहेबांच्या हस्ते..!
आज सुपा येथे रयत शिक्षण संस्था, न्यू इंग्लिश स्कूल यांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माननीय शरदचंद्रराव पवार साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, दादा कळमकर, आमदार आशुतोष काळे, मा. आमदार राहुल जगताप, तसेच सुपा ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.