बुलढाणा: आम आदमी पार्टीकडून बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या पहिल्या उमेदवाराची पक्षाकडून घोषणा
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुलढाणा शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.त्यातच आम आदमी पार्टीकडून बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पहिला उमेदवार म्हणून मनीषा प्रशांत मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.