सेलू: S B I बँकेबाहेर दबा धरून बसलेल्या दोघांनी ६५ हजारांची रक्कम असलेला थैला घेऊन केला पोबारा; सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Sep 17, 2025 शहरातील स्टेट बँकेबाहेर आज ता. १७ बुधवारला दुपारी १२ वाजताचे दरम्यान दुचाकीस्वार दोन अज्ञात व्यक्तींनी फसवणूक करून तब्बल ६५ हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी सुभाष निळकंठराव जायदे (वय ५२) रा. लहान आर्वी यांच्या फिर्यादीवरून दुपारी २.३० वाजता सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.