गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुरुकृपा लॉन येथे नगरपंचायत निवडणुकीला घेऊन भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपची नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार अजय कोठेवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शहरातील गुरुकृपा लॉन येथे आज दि.12 नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजेच्या दरम्यान भाजपच्या वतीने गोरेगाव नगर अंतर्गत कार्यकर्ता मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.